कोपर्डी घटनेवर आधारीत निर्भया चित्रपटाचे प्रमोशन

0

६ रोजी सर्व सिनेमागृहात होणार प्रदर्शीत

धुळे । अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे एका मुलीवर नराधामाने अत्याचार केल्याीच घटना मागील वर्षी घडली. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रास काहूर माजले होते. नराधमानी आत्याचार करत एक कुटुंब नाहीतर संपूर्ण महाराष्ट्रातील कुटुंब उध्वस्त केली होती या घटनेचा निषेधार्थ लाखोचा संख्येने मराठा मोर्चाची लाट उसळली होती व सर्व आरोपी जेरबंद झाले आहे. विशेष सरकारी वकील उज्वल निकम या घटनेचा कामकाज पाहत आहे. या संपूर्ण घटनेवर आधारीत स्वानंदी प्रॉडक्शनने सादर केलेल्या निर्भया या चित्रपटाच नुकतेच प्रमोशन मालेगाव येथे भूमता ब्रिगेडचा अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद बच्छाव,निर्माते अमोल अहिराव, फोरम ग्रुपचा सर्व महिला , डॉक्टर, रफिक शेख, इरफान शेख आदी उपस्थितीत होते. येत्या ६ तारखेला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

चित्रपट बघण्याचे करण्यात आले आवाहन
एक निरापराध बालीका सोडून गेली त्याचा निषेधार्थ लाखोंचा संख्येने मोर्चे निघाले. मात्र खरी श्रद्धांजली तेव्हाच मिळेल जेव्हा या नाराधमाना कठोर शिक्षा मिळेल या सत्य घटनेवर आधारीत मराठी चित्रपट सृष्टीतील प्रथमच निर्भया चित्रपट येत्या ६ तारखेला प्रेक्षकांचा भेटीला येत आहे. न्यायव्यवस्थावर पूर्णपणे विश्वास ठेवा एक दिवस या नाराधमाना कठोर शिक्षा मिळेलच असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे. चित्रपट बघावे असे आवाहन करण्यात आले आहे.