कोपर्डी प्रकरणात मुख्यमंत्र्यांची साक्ष हवीय

0

अहमदनगर । कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि खून खटल्यात बचाव पक्षानं विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची साक्ष नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच साक्षीदारांच्या यादीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचाही समावेश आहे. बचाव पक्षाला ज्यांची साक्ष काढायची आहे, अशांची यादी दिली असून त्यात हे नाव आहे.

सरकारी वकिलांनी काम सुरू केले नसल्याचा दावा
कोपर्डी सामूहिक बलात्कार आणि खून खटल्यात अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या तपासावर बचाव पक्षाला आक्षेप होता. खटला उभा राहिल्यानंतर सरकारी वकील काम सुरू करतात. मात्र खटल्यात सरकारी वकिलांनी काम सुरू केले नसल्याचा दावा बाळासाहेब खोपडे यांनी केला आहे. कोर्टाच्या निर्णयाकडे आता सगळ्याचे लक्ष लागले आहे.

गवारेंची चार तास मॅरॅथॉन चौकशी
विशेष म्हणजे भारतीय न्यायदानाच्या इतिहासात पहिल्यांदाच एका सरकारी वकिलांची साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आली आहे. तर कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे यांची न्यायालात चार तास मॅरेथॉन चौकशी झाली़ असून, सुनावणी अंतिम टप्प्यात आहे.

अ‍ॅड. उज्वल निकम यांच्या नावामुळे खळबळ
अजून तीन जणांच्या साक्षी नोंदविल्या जाणार असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते. मात्र आता अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचीच साक्ष तपासण्याची मागणी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू असून, सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी कर्जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक गवारे यांची साक्ष घेतली़, गवारे यांनी अत्याचार आणि खुनाशी संबंधित तक्रार व तपासाची माहिती दिली आहे.