मुंबई : अहमदनगरच्या कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार आणि खून प्रकरणात उच्च न्यायालयात खटल्याचे कामकाज पाहण्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. उमेशचंद्र यादव-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणातील तीनही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. या निकालाविरुद्ध आरोपींनी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. कोपर्डी घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती.
अहमदनगर जिल्हा पोलिस प्रशासनाने या खटल्यात ख्यातनाम फौजदारी वकील उमेशचंद्र यादव-पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यासंबंधीचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठविला होता. त्यास अनुसरून,विधी व न्याय विभागाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यानुसार यादव यांची या खटल्यात बाजू मांडण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.