कोपर्डी : संजीव भोर यांचा पुण्यात केला हृद्य सत्कार

0

पुणे । कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निघृण हत्या करण्यात आली हे अमानवी कृत्ये घडल्यानंतर सुरुवातीस दोन दिवस याची फारसी वाच्यता न होता प्रकरण दडपले गेले होते. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर पाटील यांनी पुढाकार घेऊन सर्व पक्षीय व सर्व सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांना बरोबर घेत पुन्हा जोरकस आंदोलन उभे केले. सोशल मीडियाचा प्रभावी वापर, तसेच प्रसार माध्यमांचा यथोचित सहभाग घेत भोर यांचा अनुभव व कौशल्य मोलाचे ठरले. समाज व कोपर्डी ग्रामस्थांच्या साथीने हा विषय तेवत ठेवून, माध्यमात आणि सरकार दरबारी याविषयी पद्धतशीर लेखी मांडणी व तपास यंत्रणेवर सतत दबाव, पाठपुरावा करण्यात भोर व त्यांच्या संघटनेचा सिंहाचा वाटा होता. भोर यांच्या नियोजनातून कर्जत तालुका येथे हजारो लोकांच्या सहभागाने, बिगर राजकीय सामूहिक नेतृत्वाखाली 16 जुलैला पार पडलेल्या 7 तासांच्या शांततामय आंदोलनाने मराठा क्रांती मूक मोर्चांचा पाया घातला.

नुकतेच या प्रकरणातील तीनही आरोपींना न्यायालयाने फाशी सुनावल्यानंतर कोपर्डी ग्रामस्थांनी संजीव भोर पाटील यांचा कोपर्डी येथे जाहीर सत्कार केला. भोर अभियंता असून ते लातूरच्या पुरणमल लाहोटी शासकिय इंजिनिअरींग कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत.चेतन कुलकर्णी, राजेंद्र नलगे, प्रमोद पत्रे, प्रवीण गवळी, प्रमोद वैद्य यांनी चंद्रकांत जीवडे, अविनाश गुंजाळ, आनंद पंडीत, नितीन अनारसे, असिफ पठाण, संजय चोरडीया, सुधाकर पानसरे, संजय शेंडे, विशाल आशर, संजय देशपांडे, निर्मला थोरमटे, सुशीला भरीतकर, अर्चना पत्रे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.या सर्वांनी या भोर पाटील यांच्या वाढदिवसाच्या जाहीर कार्यक्रमाचे आयोजन करून भोर यांचा पत्नी संगिता यांच्यासह सत्कार केला.