कोबी, सिमला मिरची आणि मटार झाले स्वस्त

0

पुणे । राज्याच्या विविध भागांसह परराज्यातून रविवारी सुमारे 160-170 ट्रक भाजीपाल्याची आवक मार्केटयार्डात झाली. फ्लॉवर आणि शेवग्याच्या भावात वाढ झाली असून कोबी, सिमला मिरची आणि मटारच्या भावात मात्र घट झाली आहे. बाजारात परराज्यांतून प्रामुख्याने कर्नाटकातून 500 ते 600 पोती, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमधून 2 ते 3 टेम्पो शेवगा, कर्नाटक आणि गुजरातमधून 14 ते 15 टेम्पो हिरवी मिरची, गुजरात व कर्नाटकातून 12 ते 13 ट्रक कोबीची आवक झाल्याची माहिती व्यापारी विलास भुजबळ यांनी दिली.

इंदौरहून 8 ते 10 टेम्पो गाजर, स्थानिक भागातून सातारी आल्याची 1500 ते 1600 पोती, टॉमेटोची 3 ते साडेतीन हजार गोणी, कोबी 8 ते 10 टेम्पो, शिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, तांबडा भोपळा 10 ते 12 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक, आग्रा, इंदौर, तळेगाव व नाशिकहून बटाट्याची 60-65 ट्रक आवक झाली. मध्यप्रदेश अणि गुजरातमधून लसणाची 5 ते साडेपाच हजार गोणींची आवक झाली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव
कांदा : 70-85, बटाटा : 50-80, लसूण : 250-500, आले सातारी : 180-240, भेंडी : 200-300, गवार : गावरान व सुरती 200-400, टोमॅटो : 500-650, दोडका : 200-300, हिरवी मिरची : 300-350, दुधी भोपळा : 50-100, चवळी : 100-150, काकडी : 150-200, कारली : हिरवी 250, पांढरी : 150-200, पापडी : 200-250, पडवळ :

250-300, फ्लॉवर : 140-160, कोबी : 60-90, वांगी : 100-200, डिंगरी : 150-200, नवलकोल : 100-120, ढोबळी मिरची : 250-300, तोंडली : कळी 200-250, जाड : 100-120, शेवगा : 500-550, गाजर : 140-160, वालवर : 300-350, बीट : 120-160, घेवडा : 300-450, कोहळा : 100-150, आर्वी : 250-300, घोसावळे : 150-200, ढेमसे : 150-200, मटार : परराज्य : स्थानिक : 400-450, पावटा : 300-350, भुइमुग शेंग 300-400, तांबडा भोपळा : 60-100, सुरण : 300-320, मका कणीस : 60-100, नारळ (शेकडा) : 1000-1600.

पालेभाज्यांचे भाव उतरले
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यासह राज्यात पाऊस चांगल्या प्रमाणात झाल्याने पालेभाज्यांचे उत्पादन वाढले आहे़ मार्केटयार्डात कोथिंबीरीची आवक तब्बल अडीच लाख जुडींची झाली आहे. तर मेथीच्या 1 लाख जुड्यांची आवक झाली आहे. तसेच इतर भाज्यांचीही आवक वाढली असल्याने भावात 10 टक्क्यांनी घट झाली आहे़

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव :
कोथिंबीर : 200-700, मेथी : 200-500, शेपू : 200-500, कांदापात : 800-1000,
चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-400, अंबाडी : 400-500, मुळे : 1000-1500, राजगिरा : 300-500, चुका : 400-600, चवळई : 300-500, पालक : 400-600.

लिंबाच्या भावात घट
फळबाजारात लिंबाची तब्बल दहा हजार गोणी इतकी आवक झाली असून आवक मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने लिंबाच्या भावात घट झाली आहे. आवक वाढल्याने दरात घट झाली. बाजारात रविवारी अननस 60 ट्रक, मोसंबी 40 टन, संत्रा 4 टन, डाळिंबाची 60 ते 70 टन, पपई 15 ते 20 टेम्पोे इतकी आवक झाली. याशिवाय पेरू 200 क्रेट, सिताफळ 2 टन, कलिंगड 10 ते 12 टेम्पोे, खरबुज 7 ते 8 टेम्पो इतकी आवक झाली.

फळांचे दर पुढीलप्रमाणे :
लिंबे (प्रति गोणी) : 50-120, अननस (डझन) 70-270, मोसंबी : (3 डझन) :
160-300, (4 डझन ) : 40-130, संत्रा (3 डझन) 160-300, (4 डझन) : 40-130, (प्रति किलोस) डाळिंब : भगवा : 20-80, गणेश 5-25, आरक्ता 10-40, कलिंगड 5-14, खरबुज 10-30, पपई 5-20, चिक्कू : 350-400, पेरू (20 किलो) 400-500,
सीताफळ : 30-150.

बेंगलौर येथून शेवंतीची आवक
फुलबाजारात बेंगलौर येथून शेवंतीची आवक सुरू झाली आहे़ या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात झाली आहे. तसेच मागणीही चांगली असल्याने दरही चांगले मिळत असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले.

फुलांचे दर (प्रतिकिलोचे भाव) :
झेंडू 20-50, गुलछडी 50-80, बिजली : कापरी : 30-60, मोगरा : 200-300, ऑस्टर
: 20-30, गलांड्या : (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी 5-10, ग्लॅडिएटर 5-10, गुलछडी काडी : 5-20, डच गुलाब (20 नग) 20-50, लिली बंडल : 5-10 अबोली लड : जबेर्रा 10-20, कार्नेशियन 60-100, शेवंती 80-150, जुई : 100-150.

आखाडमुळे मटण, चिकन, मासळी बाजारात मोठी उलाढाल
आखाड तसेच गटारीनिमित्त मटण, चिकन आणि मासळीच्या बाजारात मोठी उलाढाल झाली. शुक्रवार, शनिवार आणि रविवार दुपारपर्यंतची संधी साधून पुणेकरांनी आखाड पार्टीचे बेत आखले होते. पुणे शहर, पिंपरी चिंचवड परिसरातील हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती. घरगुती ग्राहकांसह हॉटेल व्यावसायिकांकडूनही चिकन, मटण, मासळीला मोठी मागणी होती. शहर व जिल्ह्यात रविवारी सुमारे दोन ते अडीच हजार किलो मटण, तर 500 ते 550 टन चिकनची विक्री झाली. तर, गणेश पेठेतील मासळीच्या बाजारात मोठी उलाढाल झाली.

याबाबत पुणे शहर मटण दुकानदार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे म्हणाले, नेहमीच्या तुलनेत आज मटण दुकानांमध्ये मोठी गर्दी होती. नेहमीच्या तुलनेत दुप्पट मटणची विक्री रविवारी झाली. बोकड आणि बोल्हाईच्या मटणाला मागणी जास्त आहे. गटारीसाठी मटणच्या मागणीचा अंदाज घेऊन किरकोळ व्यापार्‍यांनी मोठी तयारी केली आहे. मटणला किलोस 460 रुपये दर होता. रूपेश परदेशी म्हणाले, आखाडासाठी चिकन खरेदीला नागरिकांची गेल्या दोन
दिवसांपासून गर्दी होती. अपेक्षेपेक्षा जास्त गिर्‍हाईक आल्यामुळे काहीं दुकानदारांची धावपळ झाली. मागणी जास्त असतानाही आवकही वाढली होती. सुरमई, कोळंबी, पापलेट, बांगडा, बोंबील यासह इतर सर्व प्रकारच्या मासळीला मोठी मागणी असल्याचे मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.