मुंबई । महाराष्ट्राने आंध्र प्रदेश येथील गुटूर जिल्ह्यात होणार्या 10 व्या पुरुष व महिला राष्ट्रीय बीच कबड्डी स्पर्धेसाठी मंगळवारी आपल्या संघाची घोषणा केली. मुंबई उपनगरच्या कोमल देवकरकडे महिला, तर नंदुरबारच्या दादासाहेब आवाडकडे पुरुष संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. सध्या हे दोन्ही संघ अलिबाग येथे सराव करीत आहेत. कोमल देवकरने राष्ट्रीय स्पर्धेपासून आतापर्यंत महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम राखले आहे. शिवाय नेतृत्वाची माळदेखील आपसूक तिच्या गळ्यात पडली आहे. नुकताच तिला महाराष्ट्र शासनाच्या वतीने शिवछत्रपती पुरस्कार देण्यात आला. मुंबई शहरच्या एकाही खेळाडूला या महिला संघात स्थान मिळालेले नाही.रत्नागिरीच्या श्रद्धा पवारवर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला आहे. पुरुषांचा पूर्ण नवीन संघ पाठवण्यात आला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी विजयवाडा एक्सप्रेसने हे संघ स्पर्धेकरिता रवाना होतील. अशी माहिती राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी दिली.
महाराष्ट्राचे संघ : महिला संघ- कोमल देवकर (कर्णधार, मुंबई उपनगर),माधुरी गवंडी (ठाणे), अंकिता जगताप (पुणे), श्रद्धा पवार (रत्नागिरी), राणी उपहार (मुंबई उपनगर), मोनाली घोंगे (रायगड), प्रशिक्षक -संतोष शिर्के (रत्नागिरी); व्यवस्थापिका – श्रीमती वनिता दळवी (पुणे).
पुरुष संघ – दादासाहेब आवाड (कर्णधार, नंदुरबार),ओमकार जाधव ( मुंबई शहर ),बिपीन थळे (रायगड ), निशिकांत पाटील (ठाणे), आशिष मोहिते ( मुंबई उपनगर ),प्रमोद घुले ( पुणे ). प्रशिक्षक- दिनेश पाटील ( मुंबई शहर ), व्यवस्थापक – प्रथमेश पाटील ( रायगड ).