कोम्बिंगमध्ये हद्दपार व वॉण्टेड जाळ्यात
भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीत पोलिसांचे कोम्बिंगमुळे गुन्हेगारी वर्तुळात खळबळ
भुसावळ : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रणासाठी शहर व बाजारपेठ हद्दीत पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी मध्यरात्री कोम्बिंग राबवून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली. एका हद्दपार आरोपीला अटक करण्यात आली तर पाहिजे असलेल्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले. हद्दपार, हिस्ट्रीसिटर, पाहीजे आरोपी यांची तपासणी करण्यात आली. पोलिसांनी अचानक केलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमुळे गुन्हेगारी गोटात खळबळ उडाली.
समन्सची अंमलबजावणी
भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, सहायक निरीक्षक संदीप दुनगहू, उपनिरीक्षक इरफान काझी यांनी कोम्बिंग राबवले. वॉण्टेड सिध्दार्थ ढिवरे याला अटक करण्यात आली तसेच 25 समन्स बजाविण्यात आले. बाजारपेठ हद्दीत सहायक पोलिस अधीक्षक अर्चीत चांडक यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हरेश भोये, सहायक निरीक्षक मंगेश गोटला यांच्यासह विकास सातदिवे, समाधान पाटील, रमण सुरळकर, इॅश्वर भालेराव, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, श्रीकृष्ण देशमुख, योगेश माळी यांच्यासह आरसीपी प्लॉटून जवान यांच्या सर्वांच्या ताफ्यासह पोलिसांनी शहरातील विविध भागात जाऊन यादीवरील गुन्हेगार, पाहीजे असलेले गुन्हेगार, हद्दपार केलेले संशयीत यांची कसून चौकशी केली.
हद्दपार करण्यात आलेला हेमंत पैठणकर शहरात आढळल्याने त्यास अटक करण्यात आली.
पोलिसांनी केली अशी कारवाईअशी
पाहिजे असलेल्या 19 पैकी दोन संशयीतांना अटक करण्यात आली.
स्टॅण्डींंग वॉरंट एक बजाविण्यात आले
बेलेबल वॉरंट 7 बजाविण्यात आले
नॉन बेलेबल 2 वॉरंट बजाविण्यात आले
पोलिसांच्या यादीवरील 19 हिस्ट्रीसिटर तपासण्यात आले त्यापैकी 13 घरी मिळून आले
दिवसा घरी न सापडणार्यांन रात्री कोम्बिंगमध्ये 34 समन्य बजाविण्यात आले
विना परवाना, विना मास्क, तीन सीट चालविणे अश्या 28 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली.
1998 मध्ये दाखल झालेल्या एका गुन्ह्यातील संशयीत कासम खान या पसार आरोपीला अटक करण्यात आली.