कोयता बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

0
चिंचवड :  बेकायदेशीरपणे कोयता बाळगल्याप्रकरणी वाकड पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाला अटक केली. ही कारवाई छत्रपती चौक, पडवळनगर, थेरगाव येथे मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास केली. मिलन संजय वोदक (वय 24, रा. थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस नाईक कदम यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पडवळनगर मधील छत्रपती चौकात मंगळवारी एक तरुण कोयता घेऊन दहशत पसरवीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तरुणाला अटक करून त्याच्याकडून 100 रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता जप्त केला आहे.  वाकड पोलीस तपास करीत आहेत.