कोयत्याचा धाक दाखवून दोघांना लुटले

0

पिंपरी-कोयत्याचा धाक दाखवून रस्त्याच्या बाजूला थांबलेल्या दोघांना अज्ञातांनी लुटले. ही घटना पिंपरी येथील भुयारी रस्त्यालगत गुरुवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. गिरीश रमनानी (वय 33, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गिरीश आणि त्यांचा मित्र शिल्लू आसवाणी हे दोघे गुरुवारी रात्री एकच्या सुमारास दुचाकीवरून जात होते. पिंपरी मधील भुयारी रस्त्याजवळ लघुशंकेसाठी थांबले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी शिल्लू याच्या गळयावर कोयता ठेवला. गिरीश याला तिघांनी मारहाण केली. त्याच्या खिशातून जबरदस्तीने आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड व डेबिट कार्ड जबरदस्तीने घेतले. शिल्लूच्या खिशातील 14 हजार 950 रुपये जबरदस्तीने घेऊन मोटारसायकलवरून पळून गेले. यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.