कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या तीन आरोपींना अटक

0
आळंदी : कोयत्याचा धाक दाखवून लुटणार्‍या तीन आरोपींना व दोन विधी संघर्षित बालकांना खंडणी व दरोडा विरोधी पथकाने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आळंदी येथे करण्यात आली. अजय संजय मेटकर (वय 18, रा. देहुरोडफाटा काळेवाडी), गणेश बाळकृष्ण रंधवे (वय- 18, रा. आळंदी) आकाश बाजीराव जाधव (वय-18, रा. देहुरोड फाटा, आळंदी) अशी अटक आरोपींची नावे असून दोन विधी संघर्षित बालकांनाही ताब्यात घेतले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई गणेश कोकणे व आशिष बनकर हे गस्त घालत असताना त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत पाच मुले ही देहुफाटा थांबले असून त्यांनी चर्‍होली येथे कोयत्याचा धाक दाखवून रक्कम लुटली आहे अशी माहिती मिळाली. त्या माहितीनुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून पैसे लुटल्याचे कबूल केले. त्यानुसार त्यांच्यावर दरोडा व बेकायदेशीर हत्यार बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आळंदी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही कारवाई खंडणी व दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश कोकणे, आशीष बनकर, अशोक दुधवणे, शैलेश सुर्वे, आशिष बोटके उमेश पुलगम, शरिफ मुलाणी यांच्या पथकाने केली.