कोयना परिसरात 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप

0

पुणे : सातारा जिल्ह्यात कोयना परिसरात 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. सकाळी 11 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंपाचा धक्का बसला आहे. जमिनीत 10 किलोमीटरपर्यंत त्याची खोली होती.

भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर अनेकांनी घरातून बाहेर पडून मोकळ्या जागी धाव घेतली. या परिसरात सातत्याने भूकंपाचे सौम्य धक्के बसत असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त प्राप्त झालेले नाही. आसाम येथेही 5.2 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला असून तेथेही जीवितहानीचे झाल्याचे वृत्त नाही.