कोयनेची वीजनिर्मिती बंद होण्याच्या मार्गावर

0

पुणे : यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयनेच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची पातळी झपाट्यानं खाली येत असून, विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेला धरणातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या दोन- तीन दिवसांत कोयनेमधून होणारी जलविद्यूत निर्मिती थांबवावी लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राज्यातील भारनियमनात वाढ होण्याचीही शक्यता आहे.

कोयना धरणाची क्षणता 105 टीएमसी एवढी आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून कोयनेकडे पाहिले जाते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने धरण सुमारे 98 टक्के भरले होते. कयनेच्या पाण्यातून चार टपप्यांत 1965 मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. यातील पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॉट वीजनिर्मिती होते. हा पहिला टप्पा पूर्वीच बंद झाला असून,पुढील दुसर्‍या व चौथ्या टप्प्यातील वीजनिर्मितीही काही काळापूर्वीच बंद झाली आहे. तिसर्‍या टप्प्यात सध्या सुमारे 300 मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. मात्र, पाणीसाठा कमालीचा घटल्याने तिसर्‍या टप्प्यातील वीजननिर्मितीही नजीकच्या काळात बंद होण्याची शक्यता आहे.

कोयेतील एकूण पाणीसाठ्यापैकी 67. 5 टीएमसी पाणी वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. हे पाणी ापरले गेल्याने आता तेथे जलविद्युत निर्मिती अवघड असल्याचे सूत्राीं सांगितले. धऱमात 25 टीएमसी किंवा त्यातहून कमी पाणीसाठा झाल्यास वीजनिर्मिती बंदच केली जाते. सध्या हा साठा 25 टीएमसीवर आल्याने कधीही वीजनिर्मिती थांबवली जाऊ शकते, असे सांगण्यात आले. कोयनेचे पाणी कर्नाटकलाही दिले जाते. त्यानुसार सध्या कर्नाटकला 2.5 टीएमसी पाणी देण्यासाठी धरणातून आवरप्तन सोडण्यात आले आहे. त्यातच कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्यानेही पाणीसाठा कमी होतो आहे. कोयनेमधून होणारी वीजनिर्मिती थांबल्यानंतर राज्यात भारनियमनाचे संकट तीव्र होणार असून, राज्यातील लहान- मोठ्या उद्योगधंद्यांवर त्यांचा परिणाम होऊ शकतो.