शिक्रापूर । शिक्रापूर येथील कोयाळी गावठाण येथे असलेल्या शाळेत स्वछतागृहाच्या पायाभरणीच कार्यक्रम मंगळवारी (दि.7) संपन्न झाला. रांजणगाव एमआयडीसी येथील फियाट कंपनीच्या माध्यमातून या शाळेतील स्वच्छतागृहास 50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कोयाळी पुनर्वसन शाळेची मोठी समस्या दूर होणार आहे.
या शाळेमध्ये जवळजवळ 1200 विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत असून शाळेसाठी स्वच्छतागृह गरजेचे होते. या स्वछतागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन जयश्री भुजबळ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी शिक्रापूरचे माजी सरपंच रामभाऊ सासवडे, दत्ता गिलबिले, सागर सायकर, संपत चव्हाण, नवनाथ सासवडे व परीसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सासवडे यांनी फियाट कंपनीच्या अधिकार्यांचे कौतुक केले. या स्वच्छतागृहासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने 24 तास पाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच शाळेला केलेल्या या भरघोस मदतीमुळे विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल, असेही त्यांनी सांगितले.