कोरपावलीकरांना दिलासा ; दररोज पाणीपुरवठ्याचे आश्वासन

0

उपोषण अखेर मागे ; ग्रामपंचायत प्रशासनाची सकारात्मक भूमिका

यावल- तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीने दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन दिल्याने शनिवारपासून होणारे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. नियमित पाणीपुरवठा करावा या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य जलीलभाई पटेल यांनी उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत प्रशासनाला दिला होता. त्याची दखल घेत शनिवारी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच ग्रामसेवक आणि सदस्यांनी पवित्र रमजान महिन्यात नियमित रोज पाणीपुरवठा करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, सरपंच महेंद्र नेहेते, उपसरपंच ईस्माईल तडवी, ग्रामपंचायत सदस्य गफूर तडवी, सायबू तडवी, कय्युम पटेल, इम्रान पटेल, शोएब पटेल, दिनेश नेहेते आणि ग्रामर्स्थें,कर्मचारी उपस्थित होते.