कोरपावलीचा लाचखोर तलाठी एसीबीच्या जाळ्यात

0

कर्ज बोझ्यावरून नाव कमी करण्यासाठी स्वीकारली चार हजारांची लाच

यावल- तालुक्यातील कोरपावली येथील तलाठ्यास चार हजारांची लाच घेताना जळगाव एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. हेमंत पांडुरंग जोशी (32, रा.बोहरा मशिदीजवळ, शिवाजी नगर,जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. यावल तालुक्यातील मोहराळे येथील तक्रारदाराने या संदर्भात तक्रार नोंदवली होती. तक्रारदाराने यावलच्या आयडीबीआय बँकेचे घेतलेले कर्ज फेडल्यानंतर शेतीवर असलेला कर्ज बोझा 7/12 उतार्‍यावरून कमी करण्याच्या मोबदल्यात आरोपी तलाठी जोशी याने 11 रोजी चार हजारांच्या लाचेची मागणी केली होती. या संदर्भात तक्रार नोंदवल्यानंतर मंगळवारी आरोपी तलाठी यावल तहसील कार्यालयाजवळील एका चहाच्या टपरीवर आल्यानंतर त्यास लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. आरोपीविरुद्ध यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जळगाव एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.