कोरपावलीच्या तत्कालीन सरपंचासह ग्रामसेवकाविरुद्ध गुन्हा

0
14 व्या वित्तआयोगाचा निधीतील अपहार भोवला
यावल – तालुक्यातील कोरपावली तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांच्याविरूध्द 14 वित्त आयोगाच्या निधीत 8 लाख 46 हजार 500 रुपयांची शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणावरून सरपंच सविता जावळे अपात्र व ग्रामसेवक सुनील पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. राजकीय पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याने तालुक्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.