कोरपावलीच्या माजी सरपंचांना न्यायालयीन कोठडी

0

जामिनावर आज कामकाज : ग्रामसेवक अद्यापही पसार

यावल- कोरपावली येथील तत्कालीन सरपंच सविता संदिप जावळे यांची गुरूवारी पोलिस कोठडी संपल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर केला असून त्यावर आज शुक्रवारी सुनावणी होणार आहे. वित्त आयोगाच्या निधीत अपहार केल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होतीर दुसरा संशयीत आरोपी तथा तत्कालीन ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील हा अद्यापही पसारच आहे. कोरपावली ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत अपहार करीत शासनाची फसवणूक केल्याने 20 नोव्हेंबर 2017 रोजी यावल पोलिसात तत्कालीन सरपंच सविता संदीप जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील गुन्हा दाखल करण्यात आला होता तर 11 जुलै रोजी सविता जावळे यांना पोलिसांनी अटक केली होती. तेव्हा पासुन त्या गुरूवारपर्यंत पोलिस कोठडीत होत्या. पोलिस कोठडी संपल्यावर यावल न्यायालयात त्यांना हजर केले असता न्यायधिश डी.जी.जगताप यांनी त्यांना 15 दिवसाची न्यायलयीन कोठडी सुनावली जावळेंच्या यांच्या वकीलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला असून शुक्रवारी त्यावर कामकाज होणार आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश तांदळे करीत आहेत.