यावल- तालुक्यातील कोरपावली येेथे एका शेतमजुरास सर्पदंश झाल्यानेे अत्यावस्थ अवस्थेत येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना रविवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली. जाबीर तुरेबाज तडवी (45, रा.कोरपावली) हे गावाजवळील शेतात भुईमुगात पाणी भरण्यास गेले असता त्यात शेतात त्यांच्या डाव्या पायाला सापाने दंश केला. सर्पदंशावर तत्काळ येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर शीतल ठोंबरेे, कादर तडवी यांनी उपचार केले.