यावल : तालुक्यातील कोरपावली येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या दोघांच्या संपर्कात आलेल्यांना प्रशासनाने क्वॉरंटाईन केले आहे.कोरपावली ता. यावल येथील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर या दोघांच्या संपर्कातील परीवारातील सदस्य, भाऊबंद, नातेवाईक, सालदार, मजूर, मित्र, आणि केळी ग्रुपमधील कर्मचारी आणि केळी वाहतूक करणारे मजूर अशा एकूण 44 पुरुष आणि महिला यांना जे.टी. महाजन कॉलेजमध्ये क्वॉरंटाईन करण्यात आले असून नेहेते वाडा परीसर सील करण्यात आला आहे. गावात आजपासून जनता कफ्यू लागू करण्यात आला आहे. दरम्यान, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी हेमंत बर्हाटे, सौखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.गौरव भोईटे, विस्तार अधिकारी किशोर सपकाळे, गावचे तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य, आशा वर्कर आणि ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष आणि सदस्य परीस्थितीवर नियंत्रण ठेऊन आहेत.