यावल । तालुक्यातील कोरपावली येथे बाहेरगावी गेलेल्या महिलेच्या घरातून रोख रकमेसह सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला. ही घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. यावल पोलिसात तक्रार देेण्यात आली. कोरपावली येथील अमीनाबी मुराद पटेल ही महिला शालेय पोषण आहाराचे काम करतात.
शनिवारी तया घराला कुलूप लावून तीन दिवसांकरीता बाहेर गावी गेल्यानंतर चोरट्यांनी संधी साधत घरातील 15 हजारांची रोकड व 25 भार चांदीचे दागिने व पाच ग्रॅम सोन्याचे दागिने असा सुमारे 50 हजारांचा मुद्देमाल अज्ञात लांबवल्याचे निदर्शनास आले. पोलीस उपनिरिक्षक एम. जे. मोरे, हवालदार पांडूरंग सपकाळे यांनी भेट देत माहिती घेतली.