यावल : वारंवार सूचना देऊनही गावातील जनतेची कामे होत नसल्याने शनिवार, 16 रोजी तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला सदस्यांसह ग्रामस्थांनी कुलूप ठोकले.
ग्रामपंचायत सदस्य जलीलभाई पटेल, उपसरपंच मनीषा तडवी, ग्रामपंचायत सदस्य गफूर तडवी, सरफराज तडवी यांच्यासह ईस्माईल तडवी, अब्दुल तडवी, दत्तू तायडे, भीमराव इंधाटे, हमीद तडवी, इम्रान पटेल, रुबाब तडवी, अश्रफ तडवी यांच्यासह ग्रामस्थ प्रसंगी उपस्थित होते. जो पर्यंत गावातील समस्या वरीष्ठ अधिकारी स्वतः येथे येऊन सोडवणार नाही किंवा गावातील जनतेचे कामे पूर्ण होणार नाही तो पर्यंत कुलूप उघडू देण्यात येणार नाही, असा पवित्रता उभय सदस्यांसह ग्रामस्थांनी घेतला आहे.