यावल। तालुक्यातील कोरपावली येथे छत्रपती शिवाजी पर्यावरण व शेती विकास प्रतिष्ठान, जळगाव अंतर्गत गावाचा हागणदारीमुक्त कृती आराखडा तयार करण्यात आला. जळगाव येथील संभाजी गवळी, कुणाल पाटील, सरपंच सविता जावळे, ग्रामसेवक प्रवीण सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य जलील पटेल, सरफारज तडवी, गफूर तडवी, आदींनी गाव हागणदारीमुक्त निर्मूलन कृती आराखडा बाबत मार्गदर्शन केले. यात गृहभेटी गटचर्चा समूह चर्चा शाळा अंगणवाड्या व शासकीय कार्यालयांना भेटी दिल्या.
अंगणवाडी सेविकांसह ग्रामस्थांनी नोंदविला सहभाग
आराखडा सर्वकष तयार करण्यासाठी अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ व महिला यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाद्वारे लोकांना गाव हागणदारीमुक्त होईल असा संदेश देण्यात आला.