कोरमअभावी जामठीत ग्रामसभा तहकुब

0

बोदवड- तालुक्यातील जामठी येथील ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करण्यात आली. दुसर्‍यांदाही ग्रामस्थ उपस्थित नसल्याने ती सभा पुढे ढकलण्यात आली. जामठी ग्रामपंचायतीची ग्रामसभा 30 मे रोजी आयोजित करण्यात आली होत परंतु या ग्रामसभेला नागरिक उपस्थित नसल्याने सभा तहकूब करण्यात आली. यानंतर हीच ग्रामसभा पुन्हा त्याच ठिकाणी काही वेळानंतर घेण्याचा निर्णय झाला परंतु तरीही नागरीकांची उपस्थिती नसल्याने सदर ग्रामसभा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना ग्रामसभेची माहितीच दिली नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सरपंच कमलाबाई कडू माळकर म्हणाल्या की, ग्रामसभेची माहिती ग्रामस्थांना दिली होती परंतु सध्या शेतीच्या कामात ग्रामस्थ व्यस्त आहेत.