कोरियन खेळाडूंची चित्तथरारक प्रात्यक्षिके

0

सेंट फेलिक्स शाळेत मुलींना स्व-संरक्षणाचे धडे

पुणे । बारा फूट उंचीवर मारलेली कीक…डोळ्यावर पट्टी बांधून दाखविलेले स्व संरक्षणाचे तंत्र… अतिशय सुंदररित्या सादर केलेले तायक्वांदो अ‍ॅरोबिक्स…12 फुटावर उडी मारून फोडलेले वुडन प्लांक व टेनिस बॉल अशी श्‍वास रोखून धरणारी चित्तथरारक प्रात्यक्षिके कोरियन तायक्वांदोच्या खेळाडूंनी सादर केली.
बोट क्लब रस्त्यावरील सेंट फेलिक्स स्कूलमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सिस्टर तारा, लीना पॉल, बाळकृष्ण भंडारी उपस्थित होते. विशेष प्राविण्य मिळविणार्‍या खेळाडूंचा सन्मान कोरियाच्या व्हानगिंन सीन आणि जिआँगी ली यांच्या हस्ते करण्यात आला.
भंडारी म्हणाले, कोरिया हे तायक्वांदोचे माहेरघर मानले जाते. स्व-संरक्षणासाठी मुलींनी तायक्वांदो शिकणे हे अतिशय आवश्यक आहे. शाळेतील मुलींनी तायक्वांदो शिकण्यास प्रवृत्त व्हावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतात.