कोरेगाव: कोरेगाव- भीमा येथे विजय स्तंभाच्या दर्शनासाठी लोक एकत्र जमायचे. स्थानिक आणि बाहेरुन येणाऱ्या लोकांनामध्ये कधी कटुता नव्हती. संभाजी भिडे यांनी कोरेगाव-भीमामध्ये वेगळ वातावरण तयार केले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. कोरेगाव-भीमा आणि एल्गार परिषदेसंबंधीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले.
कोरेगाव-भीमाच्या लढाईत काही भारतीय ब्रिटिशांच्या बाजूने लढले. या लढाईत पेशव्यांचा पराभव झाला हे वास्तव आहे. एल्गार परिषद आणि कोरेगाव-भीमा या दोन वेगवेगळया घटना आहेत. एल्गार परिषदेत १०० पेक्षा जास्त संघटना सहभागी होत्या असे शरद पवार म्हणाले.