कोरेगाव पार्क येथील हुक्का पार्लरच्या मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल

0

पुणे : राज्य शासनाने हुक्का पार्लरवर बंदी आणल्यानंतरही हुक्का पार्लर चालू असलेल्या कोरेगाव पार्क येथील बर्निंग घाट रोडवरील हॉटेल डार्क हॉर्सवर पोलिसांनी छापेमारी करत हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हा दाखल केला असून तेथे हुक्का ओढणाऱ्या २० तरुण-तरुणींवर खटले दाखल केले आहेत.

हॉटेल मालक प्रदीप प्रकाश परदेशी आणि मॅनेजर सूरज पिटर थापा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहे. हॉटेल डार्क हॉर्स येथे हुक्का पार्लर चालू असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी मंगळवारी दुपारी सव्वा वाजता हॉटेलवर छापा घातला़ त्यावेळी हॉटेलमध्ये कोणतीही अग्निशामक यंत्रणा नव्हती़ कामगार हे निखारे हुक्का पॉटचे चिलीमवर ठेवत असताना दिसले़ या ठिकाणी १९ ते २५ वयोगटातील १२ तरुण व ९ तरुणी हुक्का ओढत असताना सापडले़ त्यांच्यावर खटले भरण्यात आले असून हॉटेल मालक व मॅनेजरवर गुन्हे दाखल केले आहेत़ पोलीस उपायुक्त बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त जयश्री गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बहाद्दरपुरे, पोलीस निरीक्षक गणेश माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली. शहरात हुक्का पार्लर चालविणाऱ्या हॉटेलवरील ही पहिलीच कारवाई आहे.