कोरेगाव भीमासारख्या घटना घडूच नये : वृषाली वाघमारे

0

येरवडा । कोरेगाव भीमा सारख्या घटना पुन्हा घडू नये. याकरिता सर्व समाजाने एकत्र येणे काळाची गरज असल्याचे मत मराठवाडा विकास महासंघटनेच्या शहर संघटक वृषाली वाघमारे यांनी व्यक्त केले. धानोरी येथे मराठवाडा विकास महिला महासंघटनेच्या वतीने कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ घेण्यात आलेल्या महिलांच्या सभेत त्या बोलत होत्या.

यावेळी शहर अध्यक्षा शोभा वणवे, संघटनेच्या कार्याध्यक्षा लक्ष्मी मोरे,पुष्पा निर्मल, जरीना पठाण, शहनाज फरीद, अक्षदा परदेशी, शशिकला मोरे, आशा चाफेकर, सारिका घोडके, दीप्ती घोडके, लक्ष्मी पाटील, रोहिणी शेलार, पूनम पोळ, संगीता पाखरे, संगीता रायाळू, वंदना साळवे, सुरेखा शिंदे, सुनीता साळवे, सुजाता ढगे, वैशाली पवार, आशा शहारे, शिला कडाळे वाघमारे म्हणाल्या,आज देशात विविध धर्मातील लोक राहत असून देशात होणार्‍या अनेक धर्माचे नागरिक असलेला सण गुण्या गोविंदाने साजरा करत असताना देखील अशा प्रकारच्या घटना घडणे हे दुर्दैवी आहे. त्यामुळे आज समाजात सर्व जातीधर्माबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आज समाजात अनेक महिला अशा आहेत की,त्या लोकशाहीच्या देशात सासरी होणार्‍या अन्याय व अत्याचाराला सामोरे जात असताना त्यांना समाजाकडून खर्‍या अर्थाने मदतीची गरज असून ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे याकरिता अनेक जाती धर्मातील थोर पुरुषांनी एकत्र येऊन लढा दिल्यामुळेच देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यामुळे अशा घटना घडण्यापेक्षा युवकांनी अशा महान थोर नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून समाजकार्य करण्याची काळाची गरज आहे. त्यातच कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटनेमुळे शासनासह खाजगी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना एका निष्पाप युवकास या दुर्घटनेत प्राण गमाविण्याची वेळ आली. त्यामुळे समाजात अशा दुर्दैवी घटना थांबणे आवश्यक असून यापुढे ही अशा घटना घडू लागल्या तर तरुण पिढीवर वाईट परिणाम होण्यास वेळ लागणार नाही. यावेळी सर्व धर्मियांच्या महिला निषेध सभेस उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार शोभा वणवे,लक्ष्मी मोरे यांनी मानले.