पुणे- कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात पुणे पोलिसांनी अटक केलेल्या सुधीर ढवळे, प्राध्यापिका शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन यांना पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने चौघांनाही २१जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. सरकारी वकिलांनी १४ दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने सात दिवसांची दिली.