नवी दिल्ली: देशात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. वाढती संख्या चिंता करायला लावणारी आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याने काहीसा दिलासा देखील आहे. मात्र वाढती संख्या नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना यश येतांना दिसत नाहीये. कोरोनाने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. मागील २४ तासात रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली आहे. मागील २४ तासांत देशात आत्तापर्यंतचे सर्वाधिक ५५ हजार ७९ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ८७१ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ७७९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
एकीकडे रुग्ण वाढीचा दर अधिक असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील समाधानकारकच आहे. आतापर्यंत दहा लाख ५७ हजार ८०६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. तर सध्या पाच लाख ४५ हजार ३१८ जणांवर उपचार सुरु आहेत. करोना मृत्यूची संख्या ३५ हजार ७४७ झाले आहेत.