नवी दिल्ली : भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार देशात कोरोनाच्या रुग्णांचा संख्या ४ हजारहून अधिक झाली आहे. भारतात कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत १०९ लोकांचा मृत्यू झाला असून ४०६७ लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर २३२ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. गेल्या २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६९३ कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत.
रविवारी आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाची ५०५ लोकांना बाधा आणि ११ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. यासोबतच रविवारी देशातातील कोरोनाची संख्या ३,५७७ इतकी होती, तर ८३ लोकांचा मृत्यू झाला होता. याचबरोबर, महाराष्ट्रात रविवारी २४ तासांत कोरोनाच्या ११३ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने बाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तसेच, रविवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ४६ वर जाऊन पोहोचला.
हे देखील वाचा