जळगाव – जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ९०० पार पोहोचला असुन मृत्यूदर देखिल वाढत आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी कालच्या बैठकीत टास्क फोर्स गठीत करण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार जळगाव शहरातील १० डॉक्टरांचा समावेश असलेला टास्क फोर्स गठीत करण्यात आला आहे.
कोरोना बाधित रूग्णांसाठी योग्य तो औषधोपचा, सल्ला देण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या आदेशानुसार हा फोर्स गठीत झाला आहे.
यांचा आहे समावेश
या टास्क फोर्सचे अध्यक्ष म्हणून डॉ. सुनील चौधरी, सदस्य म्हणून डॉ. गौरव महाजन, डॉ. कल्पेश गांधी, डॉ. सुशील गुजर, डॉ. अभय जोशी, डॉ. नीलेश चांडक, डॉ. लिना पाटील, डॉ. पंकज बढे, डॉ. रवींद्र पाटील, डॉ. राहुल महाजन यांचा तर सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. नागोजी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.