रावेर : गेल्या दहा दिवसात रावेर तालुक्यात 29 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल आठ जणांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांचा मृत्यू दर सुमारे 50 टक्क्यांवर पोहोचल्याने कोरोना नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना राबवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
आठ जणांनी गमावले प्राण
गेल्या दोन महिन्यांपासून रावेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रांतधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे आदींनी कसोशीने प्रयत्न केले मात्र अखेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला व बाधीतांची संख्या दिवसागणिक वाढतच आहे. तालुक्यात 21 रुग्ण बाधीत झाले असून त्यातील आठ जणांचा मृत्यू झाला आहे.