नागरीकांना घराबाहेर न पडण्याचे मुख्याधिकार्यांचे आवाहन
बोदवड : जगभरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. या विषाणूचा भारतातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. लॉकडाऊन आणि संचारबंदीसाख्या उपाययोजनांतून कोरोना विषाणूची संसर्ग साखळी तोडण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. आपणही संसर्ग टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून बोदवड शहर 1 मे ते 3 मे दरम्यान लॉकडाऊन करण्यात येणार आहे. दवाखाने, मेडिकल सुरू राहणार असून दुध डेअरी सकाळी 7 ते 9 व सायंकाळी 5 ते 7 यावेळेत सुरू राहणार आहे.
घाबरु नका पण काळजी घ्या, प्रशासनास सहकार्य करा
कोरोनाशी लढण्यासाठी सर्व नागरीकांची एकजूट महत्वाची असून येणार्या काळात घेतलेली योग्य खबरदारी आपल्याला संकटावर मात करण्यास मदत करणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीचे भान ओळखुन वागणे गरजेचे आहे. आदेशाचे पालन न केल्यास कायदेशीर दंड व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असे मुख्यधिकारी चंद्रकांत भोसले यांनी पत्र प्रसिद्धीस दिले आहे.