कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; चारही मृत्यू मुंबईत

0

मुंबई: जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा भारतातही प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोनाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. भारतात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात कोरोनाची संख्या १२४ वर पोहोचली आहे. महाराष्ट्रासाठी ही चिंताजनक बाब असताना कोरोनाचा चौथा बळी गेला आहे. एका ६५ वर्षीय वृद्धेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज कोरोनाच्या संख्येत दोनने वाढ झाली असून हा आकडा आता १२४ वर पोहोचला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गर्दी कमी झाली आहे, मात्र तरीही रुग्णसंख्येत वाढ होतच आहे. रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने सरकारने नवीन रुग्णालय तयार करण्याच्या तयारीत आहेत. मुंबईतील ११ माजली इमारतीत कोरनासाठी रुग्णालय तयार करण्याचे काम सुरु असल्याचे बोलले जात आहे.