देशात कोरोनाचा विस्फोट; आजपर्यंतचे सर्व रेकोर्ड ब्रेक

0

नवी दिल्ली: कोरोनाने जगभरात कहर माजविला आहे. देशात दररोज ६० ते ७० हजारात कोरोना रुग्ण आढळून येत आहे. मात्र मागील २४ तासात तब्बल ७५ हजार नवे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. मागील चोवीस तासांमध्ये तब्बल ७५ हजार ७६० नवे करोनाबाधित आढळले आले असून, १ हजार २३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आजपर्यंतची ही सर्वात मोठी आणि विक्रमी नोंद आहे. देशातील करोनाबाधितांची संख्या ३३ लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३३ लाख १० हजार २३५ झाली आहे. दुसरीकडे रिकव्हरी रेट देखील चांगला आहे. भारतातील रिकव्हरी रेट ७६ टक्क्यांच्या वर आहे. जगात रिकव्हरीच्या बाबतीत भारत अव्वलस्थानी आहे. आजपर्यंत २५ लाख २३ हजार ७७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या ७ लाख २५ हजार ९९१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २१ टक्के आहे. आतापर्यंत ६० हजार ४७२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. १.८३ टक्के मृत्यू दर आहे.

देशभरात २६ ऑगस्टपर्यंत ३,८५,७६,५१० नमूने तपासण्यात आले. ज्यातील ९ लाख २४ हजार ९९८ नमून्यांची काल (बुधवारी) तपासणी झाली.