नवी दिल्ली: जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. युरोपियन देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ८२ लाखांच्या पुढे गेली आहे. ८२ लाख ६७ हजार ६२३ रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र आशादायक म्हणजे भारतातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तब्बल ७६ लाख ०३ हजार १२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ५ लाख ४१ हजार ४०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासांत ३८ हजार ३१० नवीन बाधितांची नोंद झाली आहे. ४९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत ५८ हजार ३२३ रुग्ण बरे झाले आहे. नवीन बाधीतांपेक्षा २० हजार ५०३ रुग्ण बरे झाले आहे. मागील २४ तासांत १० लाख ४६ हजार २४७ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत भारतात ११ कोटी १७ लाख ८९ हजार ३५० कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ८२ लाख ६७ हजार ६२३ पॉझिटिव्ह आल्या आहेत.
भारतासाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा वेग आता मंदावत आहे. भारतात सध्या तरी कोरोनाची दुसरी लाट आलेली नाही. गेल्या महिन्याभरापासून बाधीतांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक आहे.