कोरोनाचा : सावद्यातील परदेशी कुटूंबातील पाचव्या सदस्याचाही मृत्यू

सावदा : कोरोनामुळे जिल्ह्यात सातत्याने रुग्ण संख्या वाढत असताना दुसरीकडे शहरातील एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी गेल्यानंतर पुन्हा पाचव्या सदस्याचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शहरातील परदेशी कुटुंबातील सात सदस्यांना गत महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना जळगावात उपचारार्थ हलवण्यात आले होते. या कुटुंबातील किशोर परदेशी यांच्या पत्नी संगीता परदेशी (45) यांची प्रकृती खालावली व त्यांचे 21 मार्च रोजी त्यांचे निधन झाले व सुनेच्या निधनाचा शोक अनावर झाल्याने त्यापाठोपाठ परदेशी यांच्या आई कुंवरबाई परदेशी (90) यांचे घरी वृद्धापकाळाने निधन झाले. यानंतर पती किशोरसिंग परदेशी (54) यांचे देखील 24 रोजी निधन झाले व त्यानंतर त्यांचे मोठे भाऊ व पत्रकार कैलाससिंग परदेशी (56) यांचेदेखील निधन झाले. त्यानंतर 31 मार्च रोजी पुन्हा या परीवारावर मोठे दुःख कोसळले. या परीवारातील आणखी एक भाऊ रामसिंग परदेशी (राजूभाऊ) परदेशी यांचेदेखील जळागाव येथे उपचार सुरू असताना निधन झाले. एकाच परीवारातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने सावदा शहरात हळहळ व्यक्त होत आहे.