कोरोनाचे ‘भय ना,भीती’; नंदुरबारात भरला कैऱ्यांचा बाजार

0

नंदुरबार:कोरोनाचा प्रादुर्भाव टाळावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आठवडे बाजारावर बंदी घातलेली असताना  आज मंगळवारी नंदुरबारात कैऱ्यांचा बाजार भरल्याचे दिसून आले. कैऱ्यांच्या खरेदी करण्यासाठी नागरिकांची विशेष करून महिलांची तोबा गर्दी झाली होती. कोरोनाचे भय न  बाळगणाऱ्यामूळे सोशल डिस्टन्सची ‘ऐसी की, तैसी’ झाल्याचे  पाहायला मिळाले.

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी जिल्हाभरात आठवडे बाजारात भरण्यावर बंदी घातलेली आहे.नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचेही आदेश प्रशासनाने दिले आहेत.