कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संकल्प गृपतर्फे रक्तदान शिबीर

0

शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील संकल्प ग्रुप यांच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महिलांनीही उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

कोरोना व्हायरसमुळे संपुर्ण देशात लॉकडाऊन झाल्यामुळे रुग्णालयात रक्ताची कमतरता जाणवू लागली असून प्रशासनाने नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. त्याअनुषंगाने मदतीचा एक हात या संकल्पनेतून संकल्प ग्रुपच्या वतीने संपूर्ण लॉकडाऊन काळात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. रविवारी यांच्यातर्फे हॉटेल शेरे पंजाब च्या सभागृहात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

विशेष म्हणजे या शिबीरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग कोरोनाजन्य विषाणूबाधीत गरजूंना सुपर्द करण्यात येणार आहे. या शिबिरात ११० रक्तदात्यांनी रक्तदान केले. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रक्तदान शिबीरात विशेष काळजी घेण्यात आली होती. रक्तदात्यांमध्ये तीन फुटाचे अंतर ठेवत मास्क व सॅनिटायझर देऊन रक्तदान करण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गर्दी होऊ नये म्हणून नाव नोंदणी करूनच रक्तदानासाठी बोलण्यात येत होते. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.

यावेळी प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे, सुरजितसिंग राजपाल उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संकल्प ग्रुपचे सदस्य, एच.डी.एफ.सी बॅक, आयडियल क्रिकेट क्लब, सिंधी समाज मित्र मंडळ, हॉटेल शेरे पंजाब परिवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदिंनी परिश्रम घेतले तर रक्त संकलनासाठी शहादा ब्लॅड बँकेचे नाजीम तेली यांच्यासह त्यांच्या टीमचे सहकार्य लाभले.