मुंबई: कोरोनामुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहे. आर्थिक संकट असताना पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने यात अधिकच भर पडली आहे. गेल्या दोन आठड्यापासून सलग इंधन दरवाढ झाली आहे. आज गुरुवारी देखील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत डिझेलच्या किंमतीत 14 तर पेट्रोलच्या किंमतीत 16 पैश्यांनी वाढ झाली आहे. मुंबईत नवीन दरवाढीसह पेट्रोल 86.54 तर डिझेल 77.56 प्रति लिटर झाले आहे.