नवी दिल्ली: देशात कोरोनाचा थैमान सुरूच आहे. वाढती संख्या चिंता करायला लावणारी आहे. मात्र दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले असल्याने काहीसा दिलासा देखील आहे. मात्र वाढती संख्या नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नांना यश येतांना दिसत नाहीये. कोरोनाने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. मागील २४ तासात रुग्णसंख्येची उच्चांकी नोंद झाली आहे. २४ तासात ५२ हजार करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर याच कालावधीत देशभरात ७७५ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. एका दिवसातील मृत्यूचा देखील नवा विक्रम आहे. या चिंताजनक आकडेवारीत दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत देशात १० लाख २० हजार ५८२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर देशात आतापर्यंत ३४ हजार ९६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशात पहिल्यांदाच २४ तासांमध्ये ५० हजारांपेक्षा जास्त करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. देशातील एकूण रुग्णसंख्येचा आकडा आता १६ लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचला आहे. देशातील एकूण रुग्णसंख्या १५ लाख ८३ हजार ७९२ इतकी झाली आहे. तर ७७५ रुग्णांचा २४ तासांत मृत्यू झाला आहे.