कोरोनापासुन संरक्षणसाठी नागरिकांना खासदार रक्षा खडसे यांनी केले मास्कचे वाटप

0

जामनेर: कोरोना या संसर्गजन्य आजारापासुन दूर राहण्यासाठी नागरिकाच्या आरोग्याचे हित लक्षात घेता खासदार रक्षा खडसे यांनी त्यांच्या कोथळी गावी मास्कचे वाटप केले. आज 6 एप्रिल भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन. लहानश्या रोपट्यापासून विशाल अशा वटवृक्षामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे रूपांतर झाले आहे. आज भारतीय जनता पक्ष जगातील सर्वात मोठा पक्ष झाला असून अशा विशाल भाजप परिवाराचे आपण सन्माननीय सदस्य आहोत. भाजप स्थापना दिनानिमित्त अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या लोकांना सुरक्षेसाठी मास्कचे वाटप करण्यात आले.