कोरोनामुक्त पोलीस कर्मचाऱ्याचे पोलिस निरीक्षकांनी केले स्वागत

0

जळगाव : एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यावर सोमवारी गोविंदा पाटील पुन्हा कर्तव्यावर हजर झाले. यावेळी पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी त्यांचे पुष्पहार तसेच पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही टाळ्या वाजवुन गोविंदा पाटील यांचे मनोबल वाढविले. यावेळी पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांनी मनोगतातुन कोरोना योध्दा गोविंदा पाटील यांचे कौतुक केले.