कोरोनावरील लस: उद्या टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक

0

नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. देशातील कोरोनाबाधितांची संख्या २२ लाखांच्या पुढे गेल्याने चिंता वाढली आहे. कोरोना पूर्णपणे नष्ट करण्यासाठी अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध, किंवा लसची निर्मिती झालेली नाही. संपूर्ण जगात कोरोनाची लस तयार करण्यासाठी स्पर्धा सुरु आहे. मात्र अद्याप एकाही देशाला यात यश आलेले नाही. दरम्यान जगातील तीन ते चार लसी मानवी चाचणीच्या अंतिम टप्प्यात असून सर्व सुरळीत झाल्यास सप्टेंबरपासून त्याचा वापर सुरु होईल. लस बाजारात आल्यानंतर त्याचे नियोजन कसे करावे? यासाठी उद्या बुधवारी टास्क फोर्सची बैठक बोलविण्यात आली आहे. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

लस खरेदी, प्राधान्यक्रम आणि वितरण या संबंधी निती आयोगाचे डॉ. व्ही.के.पॉल यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञ चर्चा करणार आहेत.

करोनावरील लसीचा कार्यक्रम ठरवताना सर्व अंगांनी विचार करण्यासाठी सरकारने तज्ज्ञांची ही समिती स्थापना केली. यामध्ये संबंधित मंत्रालये, संस्थांचे प्रतिनिधी आहेत. लस निवडण्यापासून ते खरेदी आणि वितरणाची जबाबदारी टास्क फोर्सवर असेल. सोमवारी भारतामध्ये ६२,०६४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली. एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला.