कोरोनावर उपचारार्थ जिल्हा रुग्णालयाची यंत्रणाच ‘व्हेटींलेटर’वर

0

उपाययोजना तोकड्या ; सेनिटायझर, स्ट्ररलियम, मास्कचा साठा संपण्याच्या मार्गावर ; आरोग्य उपसंचालकांकडे पत्रव्यवहार

जळगाव : संपुर्ण देशावर कोरोनाचे संकट येवून ठाकले असून जिल्हातही यंत्रणा अलर्ट आहे. मात्र जिल्हा सामान्य रुणालयातील यंत्रणेजवळ तोकड्या उपाययोजना असल्याचे समोर आले असून सानिटायझर, स्ट्ररलिम आदी प्रथमिक गरजेच्या अवश्यक साधनांचा तुटवडा आहे. सदरचा आहे तो साठा संपण्याच्या मार्गावर आहे. तर दुसरीकडे दुर्देवाने जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ही रुग्ण आढळून गुणाकार पध्दतीने रुग्ण वाढले तर एकच व्हेंटीलेटर असल्याने जिल्हा रुग्णालयासह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडणार आहे. प्रशासनाची कसरत होवू नये म्हणून रोटरी गोल्ड सिटीने जिल्हा रुग्णालय प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. भाडे तत्वावर व्हेंटीलेटरसह आवश्यक सर्व वस्तू त्यांच्याकडून उपलब्ध करण्याबाबत हालचाली सुरु आहेत.

सेनिटायसर, मास्कचा तुटवडा
जिल्हा समान्य रुग्णालयतील नेत्र विभागात कोरोना संसर्ग कक्ष उभारण्यात आला आहे. या ठिकाणी संशयित रुग्णांसाठी अवश्यक त्या उपाययोजना प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. मात्र या कक्षासह रुग्णालयातील इतर विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारीका व इतर आरोग्य कर्मचार्‍यांच्या दृष्टीने महत्वाच्या अशा सेनिटायझर, मास्क, ग्लोज आदी साधनांचा तुटवडा आहे. आहे तो साठा काटकसरीने वापरण्यात येत असून काही दिवसात तोही संपण्याच्या मार्गावर आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाने आरोग्य उपसंचाल कार्यालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र 10 दिवस झाले तरी साधने उपलब्ध झालेले नाही.

रोटरी गोल्टसिटीच्या पदाधिकार्‍यांकडून भेट

कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्याने त्यावरील रुग्णांच्या उपचारार्थ जिल्हा रुग्णालयाकडे नेमकी काय सुविधा उपलब्ध आहेत, तसेच नेमक्या कोणत्या साहित्याची आवशक्यता आहे. याबाबत रोटरी गोल्डसिटीच्या नंदु आडवानी, चंदर तेजवानी, सतिष मंडोरे, प्रशांत कोठारी यांनी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांची भेट घेतली. त्याच्याकडून उपलब्ध साहित्य तसेच यंत्रणा याबाबत माहिती घेतली. तसेच आवश्यक असलेल्या फोर्टबेल निब्युलायझर, ओ टू मास्क, वैयक्तिक संरक्षण सामुग्री या साहित्यासह व्हेंटीलेटर मिळवून देण्याबाबत चर्चा केली. व मिळवून देण्याचे आश्‍वासनही दिले.

वैयक्तिक संरक्षण सामुग्री उपलब्ध करावी
गेल्या दोन तीन दिवसापासून समाज माध्यमांवर अशा रूग्णांवर उपचार करणार्‍या शासकिय अशासकिय रूग्णालयातील इंटर्न, डॉक्टर्स, कर्मचार्‍यांना पीपीई अर्थात ,वैयक्तिक संरक्षण सामुग्री पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची शोकांतिका आहे. अशा रूग्ण किंवा संशयित रूग्णावर उपचार करणार्‍या सर्व मानवतेच्या दूतांना त्यांच्या संरक्षणाचा अधिकार नाही का? असा प्रश्‍न उपस्थित होत असून वैद्यकिय यंत्रणेतील डॉक्टर्स व कर्मचारी यांचे मनोबल, आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना देखील त्याच्या संरक्षणाची सामुग्री मिळालीच पाहिजे. अशी मागणी आय एम ए चे माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ रवी वानखेडकर व जळगावचे डॉ. राधेश्याम चौधरी यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री आदींकडे ट्विटरद्वारे केली आहे.

जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष
जिल्हा रुग्णालयात मंगळवारी नवीन कोरोना संशयित रुग्ण दाखल आहे. रुग्ण 24 वर्षीय तरुण चोपडा येथील असून तो पुणे येथे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कात आला आहे. त्रास जाणवल्याने तो उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आहे. दरम्यान नेत्र विभागात कोरोना संसर्ग कक्ष उभारण्यात आल्यानंतर आता याच विभागाच्या शेजारी पुणे, मुंबईहून परतलेल्यासह लक्षणे जावणार्‍यांच्या तपासणीसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. यात कक्षात मंगळवारी 190 जणांची तपासणी करण्यात आली आहे.