शिंदखेडा: कोरोनाची संख्या दिवसेदिवस सर्वदूर वाढत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाविषयी रोज नागरिकांना काहीना काही नवीन ऐकायला मिळते. त्यामुळे अधिक संभ्रमावस्था निर्माण होत आहे. त्यासाठी या परिस्थितीत काय करावे आणि काय करू नये हे नागरिकांपर्यंत अधिक सोप्या भाषेत पोहचावे, यासाठी डॉक्टर्स क्लब, शिरपूर, डॉक्टर्स असोसिएशन, शिंदखेडा आणि स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते.
ऑनलाईन वेबिनारच्या माध्यमाने शिरपूर शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांनी मार्गदर्शन केले. त्यात Dos and Donts of COVID 19 याविषयीची माहिती
डॉ.अमित गुजराथी (एम.डी.मेडिसिन)यांनी slide showच्या माध्यमाने समजून सांगितली. आपल्याला कोरोना हा आजार नियंत्रणात आणता येईल, त्यासाठी काही बंधन आपल्याला पाळावे लागतील. आयुष मंत्रालयाने सुनिश्चित केलेला आयुश आयुर्वेदिक काढा कसा घ्यावा यासाठी – डॉ विशाल पाटील (एम.डी.आयोर्वेद) यांनी तर आर्सेनिक अल्बम-30 चे सेवन कसे करावे व पथ्य कोणती पाळावीत याचेही मार्गदर्शन डॉ.कांचन ईशी (एम.डी.होमिओपॅथी)यांनी केले.
वेबिनारला प्रतिसाद
लॉकडाऊनमध्ये मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप इ. इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. अश्यावेळी आपल्या डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याविषयी डॉ.राखी अग्रवाल (एम.एस.डोळेतज्ञ) यांनी मार्गदर्शन केले. वेबिनारला नाशिक, पुणे तसेच दुबई येथूनही प्राध्यापक, डॉक्टर इ.चा चांगला प्रतिसाद मिळाला. वेबिनारद्वारे अत्यंत उपयोगी माहिती मिळाली व शंकेचं निरसन झाले यामुळे उपस्थित सर्वांनी आयोजकांना धन्यवाद दिले.
डॉ.आशिष अग्रवाल हे वेबिनारचे समन्वयक होते. त्यांनी वेबिनारचे सर्व आयोजन केले होते.वेबिनारसाठी नगरसेवक शामकांत ईशी व डॉ.सुनील ईशी यांचे विशेष सहकार्य लाभले.यशस्वीतेसाठी चेतन गुरव, शक्ती राजपूत, कुणाल गुरव, गोपाल गुरव, दिनेश ठाकूर व राज परदेशी यांनी परिश्रम घेतले.
प्रास्ताविक शिरपूर डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनील ईशी तर आभार शिंदखेडा डॉक्टरर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.देवेंद्र पाटील व स्वामी विवेकानंद सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.उमेश चौधरी यांनी मानले.