कोरोनावर मात करणार्‍या योद्ध्यांचा साकेगावात सत्कार

0

साकेगाव : गावातील मूळ रहिवासी असलेली कन्या मुंबई नायर रुग्णालयात कर्तव्य बजावत असताना ती कोरोना पॉझीटीव्ह झाली होती मात्र कोरोनावर मात करून ती साकेगावात आल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा परीषद सदस्य रवींद्र नाना पाटील यांनी बुके देवून तिचा सत्कार केला. उपसरपंच विनोद पवार, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, अमृत पवार, राजेंद्र पवार, चंद्रकांत पवार व महिला उपस्थित होत्या.