कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ‘ही’ सप्तपदी आवश्यक

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रीय लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावेळी देशवासियांशी संवाद साधतांना त्यांनी या सात गोष्टींवर साथ मागितली आहे. कोरोनावर विजय मिळवण्यासाठी ही सप्तपदी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

१. घरातील ज्येष्ठांची जास्त काळजी घ्या
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन
३. रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाच्या नियमांचे पालन
४. आरोग्य सेतू मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करा
५. शक्य तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या
६. व्यवसायिक, उद्योजकांनी कामगारांना नोकरीवरुन काढू नका
७. डॉक्टर, स्वच्छता दूत, पोलिसांचा सन्मान करा

मोदींनी मानले देशवासियांचे आभार

सर्व देशवासियांच्या त्यागामुळे भारताने आतापर्यंत करोनाशील अत्यंत मजबुतीने दोन हात केले आहेत, मोठे नुकसान टाळले आहे. जनतेने त्रास सहन करुन आपल्या देशाला वाचवले आहे. अनेकांना त्रास सहन करावा लागला, कुणाला खाण्याची अडचण, कुणाला जाण्या-येण्याची अडचण, काही जण घरापासून दूर आहेत. पण प्रत्येक जण आपले कर्तव्य पार पाडत आहे. सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. आपल्या संविधानात आम्ही भारतीय लोक याचा उल्लेख आहे, ती हिच गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या सामूहिक शक्तीचा संकल्प ही खरी आदरांजली आहे’ असे म्हणत मोदींनी आदरांजलीही वाहिली.