खिर्डी : कोरोनाविरुद्ध लढाई जोरात सुरू असून या लढाईत डॉक्टर, आशा वर्कर, पोलिस पाटील, पोलिस प्रशासन, पत्रकार, समाजसेवक कोरोनाविरुद्ध योद्धे बनले असून सर्वच आपापल्या परीने जनजागृती करून नागरीकांना घरातच थांबण्याचे आवाहन करताना दिसत आहेत तर विनाकारण बाहेर फिरणार्यांवर कारवाईदेखील या माध्यमातून होताना दिसत आहे.
योद्ध्यांची अविरत समाजसेवा
निंभोरा प्राथमिक केंद्रातील डॉ.चंदन पाटील हे संशयितांना तपासण्यासाठी अग्रगण्य असतात. पोलिस प्रशासन आपल्या कुटूंबाना सोडून अविरत सेवा देत आहे तर पत्रकार गावोगावात जाऊन कोरोना विषयी जनजागृती करतांना दिसत आहेत. डॉक्टर, कर्मचारी, पत्रकार, पोलिस प्रशासन दिवस-रात्र मेहनत घेत आहे यामुळे खिर्डीतील लढाई सोपी होताना दिसत आहे. या लढाईत असणारे योद्ध्यांमध्ये प्राथमिक केंद्राचे डॉ.चंदन पाटील, तलाठी एफ.एस.खान, कोतवाल अनंत कोळी, सर्कल अधिकारी मीना तडवी, खिर्डी खुर्द येथील पोलिस पाटील प्रदीप पाटील, खिर्डी खुर्द येथील ग्रामसेवक सोनवणे, सरपंच व सदस्य तसेच कर्मचारी वर्ग व पत्रकार गुणवंत पाटील, प्रवीण धुंदले, शेख इद्रिश, कांतीलाल गाढे, खिर्डी बुद्रुक मधील ग्रामसेवक, सरपंच गफूर कोळी, सदस्य कर्मचारी वर्ग, पत्रकार रीतेश चौधरी, प्रदीप महाराज, खिर्डी बुद्रुक माजी पोलिस पाटील अरुण पाटील, गावातील समाजसेवक जाकीर पिंजारी, नईम बेग आदी झटत आहेत.