कोरोनाविरोधातील टास्कफोर्समध्ये डॉ. उल्हास पाटील

0

मुंबई : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने कोरोना विरोधातील लढाईसाठी टास्कफोर्स आणि विविध उपसमित्यांची घोषणा केली आहे. त्यासाठी 18 नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली हा टास्कफोर्स काम करणार असून, राज्य सरकारला वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करणार आहे.

माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आरोग्य उपसमितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले असून, माजी मंत्री डॉ. शोभाताई बच्छाव ह्या समन्वयक आणि डॉ. मनोज राका सचिव आहेत. ही उपसमिती वैद्यकीय सेवेचे अवलोकन करुन सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांना आवश्यक असलेल्या सुविधांसंदर्भात सूचना करणार आहे.